घरफोडी पर्दाफाश ! दोघे भाऊ जेरबंद, ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव , 31 ऑगस्ट (हिं.स.) एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामेश्वर कॉलनी येथील घरफोडीचा पर्दाफाश झाला असून एमआयडीसी दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल ३१ लाख २६ हजार ८०० रुपये किमतीचे २०८ ग्रॅम सोने आणि २८ ग्रॅम चांदी हस्
घरफोडी पर्दाफाश ! दोघे भाऊ जेरबंद, ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत


जळगाव , 31 ऑगस्ट (हिं.स.) एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामेश्वर कॉलनी येथील घरफोडीचा पर्दाफाश झाला असून एमआयडीसी दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल ३१ लाख २६ हजार ८०० रुपये किमतीचे २०८ ग्रॅम सोने आणि २८ ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात आली आहे रामेश्वर कॉलनीतील रहिवासी संगीता घुगे या २७ ते २८ ऑगस्ट दरम्यान आपल्या कुटुंबासह मध्य प्रदेशातील उज्जैन येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने कडी-कोंयडा तोडून घरात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. घुगे कुटुंबीय परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना आरोपींचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून पुरावे संकलित केले. त्यानंतर तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विशाल मुरलीधर दाभाडे (२५) आणि जितेंद्र मुरलीधर दाभाडे (२७), दोघेही रा. सप्तश्रृंगी माता मंदिराजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव, यांना ताब्यात घेतले.पोलिसांनी दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी घरफोडीच्या गुन्ह्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले सोन्याचे विविध दागिने आणि चांदीचे जोडवे हस्तगत करण्यात आले. त्यात सोन्याचे गंठन, मिनी पाटली, फॅन्सी शॉर्ट पाटली, काळेमणी पाटली, टॉप्स, विविध प्रकारच्या अंगठ्या, नथ तसेच इतर सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. याशिवाय २८ ग्रॅम वजनाचे चांदीचे जोडवेही हस्तगत करण्यात आले. असा एकूण २०८ ग्रॅम सोने आणि २८ ग्रॅम चांदी असा ३१ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत आरोपी जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande