
बीड, 31 ऑगस्ट (हिं.स.) : श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी बीड जिल्ह्यातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने तिसऱ्या सोमवारनिमित्त जिल्ह्यातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. अनेक भाविकांनी उपवास करून मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक केला. तसेच बेलपत्र, फुले आणि फळे अर्पण करून महादेवाचे दर्शन घेतले.
अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासून पूजा-अर्चा, अभिषेक, महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी भजन, कीर्तन आणि हरिनाम सप्ताहाचेही आयोजन करण्यात आले. महिलांसह आबालवृद्ध आणि तरुणांनी मोठ्या संख्येने मंदिरांमध्ये उपस्थिती लावली.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis