मराठा समाजाने 12 तारखेपर्यंत मुंबईला जा, मनोज जरांगेंचा निर्धार
जालना, 31 ऑगस्ट (हिं.स.) - मी उपोषण सोडणार नाही आणि मुंबईला जाणारच, असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी मराठा समाज बांधवांनी १२ सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहोचावे. मी मुंबईत आलो आहे, असा निरोप मिळताच सर्व समाजबांधवांनी तातडीने रस्त्यावर उतरावे, असे स्पष
जरांगे उपोषण


जालना, 31 ऑगस्ट (हिं.स.) - मी उपोषण सोडणार नाही आणि मुंबईला जाणारच, असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी मराठा समाज बांधवांनी १२ सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहोचावे. मी मुंबईत आलो आहे, असा निरोप मिळताच सर्व समाजबांधवांनी तातडीने रस्त्यावर उतरावे, असे स्पष्ट आवाहन मनोज जरांगे यांनी केले. आंदोलन कडक होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांनी पकडून ठाण्यात नेले तरी मराठा बांधवांनी अजिबात घाबरू नये, असा धीर त्यांनी आंदोलकांना दिला. मुंबई आंदोलनाबाबत ठाम राहत त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, मागणी पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. सरकारच्या अधिकृत शिष्टमंडळाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. इकडे उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला तरी सरकारकडून कोणतीही ठोस चर्चा झाली नसल्याने मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला मुंबई कूच करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मनोज जरांगे म्हणाले, आम्ही मुंबईला जायची तयारी करतोय. मराठा समाजाला सांगतो 12 सप्टेंबरपर्यंत हळूहळू मुंबईला जा. आपल्या सोयीनुसार तिथे राहा, फक्त आझाद मैदानावर जाऊ नका. मराठे मुंबईत आलेले त्यांना कळले नाही पाहिजे. पाहुणे, मित्र यांच्याकडे राहा. पोलिसांनी तुम्हाला जर उचलून नेले तर बिनधास्त पोलीस स्टेशनला जा, उलट तिथे चांगली सोय होते. उपोषण सोडणार नाही, मी बरोबर मुंबईत जातो. सगळे सोबत जाणे शक्य नाही. सरकारकडून कोणीही संपर्क साधलेला नाही. आमचे 12 तारखेला ठरल्यावर जाणार. आमची राज्‍य सरकारबरोबर चर्चा सुरु नाही. मंत्री विखे पाटील म्हणत असतील जरांगे पाटील यांच्याशी बोलणी सुरू आहेत तर ते दुसरे जरांगे पाटील असतील, असे स्‍पष्‍ट करत १२ सप्‍टेंबर रोजी आंदोलन केले जाणार नाही. मात्र १२ सप्‍टेंबरला मुंबईल केव्‍हा जायचे याबाबत निर्णय घेतला जाईल. सरकारची चर्चेसाठी दारे खुली असतील, पण आम्हाला जायचं नाही त्यांच्याकडे. चर्चेसाठी आमची दारे ही खुली आहेत. असेही जरांगे पाटील यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

देवेंद्र फडणवीस, भाजपने सांगावे की, मराठ्यांच्‍या कुणबी म्‍हणून 58 लाख नोंदी सापडल्या नाहीत, मराठ्यांना एकनाथ शिंदे यांनी फसविले, अन्यथा एकनाथ शिंदे यांनी सांगाव की 58 लाख नोंदी आहेत. चारही रद्द झालेले जात प्रमाणपत्र शैक्षणिक देखील आहेत. ते प्रमाणपत्र रद्द होण्यासारखे न्हवते, रद्दच होत नसतील तर पुढे अपिलामध्ये आम्ही न्यायालयात का जायचे?, असा सवाल करत गणेशोत्सव आपला आहे, आम्‍ही आमच्‍याकडे ११ दिवसांचा गणपती बसवतो. आमच्या इतके देव देव कुणी करीत नाही, एक दीड दिवसाचा गणपती बसवणार आणि आम्हाला शिकवणार का? आमच्या एवढं पुण्य कोण करतं, असा टोलाही त्‍यांनी यावेळी लगावला.

संविधानात असेल म्हणूनच जीआर निघाला असेल. भ्रष्टाचारी लोकांना भाजपमध्ये घेतले तर ते साविधानिक आहे. तुम्ही कितीही हजार कोटीचा घोटाळा करा ते साविधानिक आणि जे खरे त्यांना जेल मध्ये टाका. सरकारने सगळ्या मागण्यांच्या अंमलबजावणी केल्यावर या आंदोलनावर तोडगा निघेल, असा पुन्‍नरुच्‍चारही त्‍यांनी केला.

मंत्री उदय सामंत यांच्या संभाव्य दौऱ्यावर आणि सरकारच्या संपर्कावर प्रतिक्रिया देताना जरांगे पुढे म्हणाले, 24 तासात संपर्क साधू म्हणजे पावसासारखं आहे का, हळूहळू सरी पडणार. पोराहो आपले मुंबईचे सुरू करा, असे त्यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे संपला पाहिजे म्हणून मंत्री शिरसाठ यांनी गेम केला आहे, असा आरोप करत मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळे उतरती कळा येणार आहे मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदे यांची बराबरी करू शकले नाहीत. लाखांची सभा घेणाऱ्या शिंदेंना 5 हजार ची सभा घ्यावी लागली. त्‍यांची सभा होणार आहे, हे मला उशिरा कळलं, मी जाण्याआधी 10 ते 12 लाख मराठे जमले असते, नाहीतर परभणी ते नांदेड पर्यंत एकनाथ शिंदे यांना पळायला देखील जागा मिळाली नसती. मी जर परभणीकडे एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी निघालो असतो, तर नांदेडच्या विमानतळाचे सर्व दरवाजे तोडून मराठे विमानतळात घुसले असते. तुम्ही सांगा सभा घेणार मग बघितले असते, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिले.

-------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande