
मुंबई, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। माजी राज्यपाल, 'पद्मश्री' डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या रुपात शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील एक द्रष्टे व अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या असंख्य संस्था आणि त्यातून घडलेली असंख्य आयुष्ये त्यांच्या चिरकालीन योगदानाची ग्वाही देत राहतील, असे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.
ते म्हणाले, आमचे वडील डॉ. शंकरराव चव्हाण यांच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. मला देखील नेहमीच त्यांचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पाटील कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून, ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर