अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला 20 वर्षे सक्त कारावास
लातूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। मुरूड पोलिसांच्या भक्कम तपासाला यश; पॉक्सो प्रकरणात आरोपीला 20 वर्षांची शिक्षा पीडितेला न्याय; लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दोषी, 20 वर्षे कारावास मुरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्
पोलीस कारवाई


लातूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)।

मुरूड पोलिसांच्या भक्कम तपासाला यश; पॉक्सो प्रकरणात आरोपीला 20 वर्षांची शिक्षा

पीडितेला न्याय; लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दोषी, 20 वर्षे कारावास

मुरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी ऋषीकेश भगवान नरवाडे (रा. मसल्लगा, ता. कंधार, जि. नांदेड) याला पॉक्सो कायदा, 2012 अंतर्गत दोषी ठरवत 20 वर्षे सक्त कारावास आणि ₹8,000 दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

पीडितेच्या आजी यांनी 29 मे 2024 रोजी मुरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. आलेवार, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नागरगोजे, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे करण्यात आला.

न्यायालयात विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. मंगेश महिंद्रकर यांनी सरकार पक्षाची प्रभावी बाजू मांडली. वैज्ञानिक पुरावे, तपास आणि साक्षीदारांच्या आधारे सरकार पक्षाने आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या खटल्याचा प्रभावी पाठपुरावा करण्यात आला. या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांविरोधात कठोर संदेश गेला असून पीडितेला न्याय मिळाला आहे.

-

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande