मध्यपूर्वेतील तणावात पाकिस्तान-सौदी-तुर्की यांच्यात ‘मक्का संयुक्त संरक्षण करार’
रियाध, 07 ऑगस्ट (हिं.स.)।मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की यांनी ‘मक्का संयुक्त संरक्षण करार’ या महत्त्वपूर्ण संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या केल्या. प्रादेशिक सुरक्षेबाबत वाढत्या चिंतेच्या
मध्यपूर्वेतील तणावात पाकिस्तान-सौदी-तुर्की यांच्यात ‘मक्का संयुक्त संरक्षण करार’


रियाध, 07 ऑगस्ट (हिं.स.)।मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की यांनी ‘मक्का संयुक्त संरक्षण करार’ या महत्त्वपूर्ण संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या केल्या. प्रादेशिक सुरक्षेबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर झालेला हा करार तिन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे.

या करारानुसार, तिन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर झालेला सशस्त्र हल्ला हा तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. अशा परिस्थितीत तिन्ही देश सामूहिक सुरक्षेच्या तत्त्वानुसार एकत्रितपणे प्रतिसाद देतील.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या कराराचा उद्देश कोणत्याही प्रकारच्या आक्रमणाविरोधात सामूहिक सुरक्षा अधिक मजबूत करणे हा आहे. तिन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर झालेला सशस्त्र हल्ला हा सर्व देशांवरील हल्ला मानला जाईल. तसेच संरक्षण क्षेत्रातील परस्पर सहकार्य अधिक प्रभावी करण्याची तरतूदही या करारात करण्यात आली आहे.”

हा करार सौदी अरेबियामध्ये सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान करण्यात आला. या करारामुळे तेलसंपन्न सौदी अरेबिया, अण्वस्त्रसज्ज पाकिस्तान आणि तुर्की हे संरक्षणाच्या दृष्टीने अधिक जवळ आले आहेत. तुर्कीकडे नाटो मधील अमेरिकेनंतरची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सेना असून, त्याचा संरक्षण उद्योगही वेगाने विस्तारत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande