नाशिक टीसीएस प्रकरण : नगरसेवक मतीन पटेलला अटक
Nashik police arrests corporator Patel
नाशिक टीसीएस प्रकरण : नगरसेवक मतीन पटेलला अटक


नाशिक , 07 ऑगस्ट (हिं.स.)। नाशिकमधील टीसीएस प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ निर्माण झालेली आहे. या प्रकरणाचे अनेक धागे दोरे असून या प्रकरणात अनेक खुलासे झाले आहेत. या प्रकरणी आता एक मोठी कारवाई करण्यात आली असून एका नगरसेवकाला अटक करण्यात आलेली आहे.या प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा खान हिला स्वतःच्या घरात आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरयेथून अटक केली आहे. न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंट (एनबीडब्ल्यू) नंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मतीन पटेल यांची आतापर्यंत तीन वेळा चौकशी केली होती. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून अनेक महत्त्वाची माहिती घेण्यात आली असून, तपासासाठी त्यांचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड, संदेश आणि इतर डिजिटल माहितीची तपासणी सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून मिळाली आहे.

दरम्यान, नाशिक रोड न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश असूनही मतीन पटेल न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात नॉन-बेलेबल वॉरंट जारी केले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान, नाशिक रोड न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश असूनही मतीन पटेल न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात नॉन-बेलेबल वॉरंट जारी केले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी प्रशासनाने मतीन पटेल यांच्या बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर चालवत त्याचे घर आणि कार्यालय पाडले होते. तर प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या निदा खानला जुलै महिन्यात जमीन मिळाला होता. या प्रकरणातील आरोपी निदा खान ही गरोदर असल्याने तिला जुलै महिन्यात सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. ६ जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त सत्र न्यायालयाने ५ महिन्यांची गरोदर असलेल्या निदा खानच्या पोटातील बाळाच्या आरोग्याचा आणि भविष्याचा विचार करत हा निर्णय दिला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande