देशाला सक्षम शिक्षणमंत्री हवा – पृथ्वीराज चव्हाण
मुंबई, 07 ऑगस्ट (हिं.स.) : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पदत्यागानंतर देशाला सक्षम, विश्वासार्ह आणि राष्ट्रीय स्तरावर स्वीकारार्ह शिक्षणमंत्र्यांची गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात
पृथ्वीराज चव्हाण


मुंबई, 07 ऑगस्ट (हिं.स.) : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पदत्यागानंतर देशाला सक्षम, विश्वासार्ह आणि राष्ट्रीय स्तरावर स्वीकारार्ह शिक्षणमंत्र्यांची गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर आणि नेतृत्वावर तीव्र टीका केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, CJP आणि जनरेशन Z यांच्या ऐतिहासिक आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पद सोडावे लागले. सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असला तरी ही केवळ तात्पुरती व्यवस्था असून, लवकरच पूर्णवेळ शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती करावी लागेल. देशाच्या शिक्षण व्यवस्थेला नवसंजीवनी देणारा, जनरेशन Z शी संवाद साधू शकणारा आणि शिक्षणासाठी अधिक निधी मिळवून देणारा राष्ट्रीय स्तरावरील नेता सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात दिसत नसल्याचेही त्यांनी म्हटले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून शिक्षणमंत्री करण्याची चर्चा सुरू असल्याचा उल्लेख करत, त्यांना ना जनरेशन Z स्वीकारेल, ना काँग्रेस असे या ट्विट मध्ये म्हटले आहे. २०२६ च्या NEET पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातील काही कोचिंग संस्था आणि प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांची नावे समोर आली होती. त्याचवेळी फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असल्याने त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रकरणात महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातील काही राजकीय नेत्यांचाही सहभाग होता का, हे केवळ विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीतूनच स्पष्ट होऊ शकते, असेही चव्हाण यांनी म्हटले.

उच्च शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेपेक्षा विचारसरणीला प्राधान्य देण्यात आल्याची टीका करत, नव्या शिक्षणमंत्र्यासाठी एखादा शिक्षणतज्ज्ञ, माजी कुलगुरू, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचा विचार होऊ शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande