सरवदे खून प्रकरणात शालन शिंदे यांचा जामीन मंजूर; न्यायालयीन प्रक्रिया कायम
सोलापूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)।सोलापूर महानगरपालिका निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तत्कालीन शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या भाजपाच्या विद्यमान नगरसेविका शालन शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामी
सरवदे खून प्रकरणात शालन शिंदे यांचा जामीन मंजूर; न्यायालयीन प्रक्रिया कायम


सोलापूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)।सोलापूर महानगरपालिका निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तत्कालीन शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या भाजपाच्या विद्यमान नगरसेविका शालन शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

या बहुचर्चित खून प्रकरणात शालन शिंदे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावरील सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी अद्याप सुरू असून, खटल्याचा अंतिम निकाल लागणे बाकी आहे.दरम्यान, जामीन मंजूर होणे म्हणजे प्रकरणातील आरोपांवर अंतिम निर्णय झालेला नसून, खटल्याची सुनावणी आणि पुढील न्यायालयीन प्रक्रिया नियमानुसार सुरू राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande