

रुग्णांच्या वेशभूषेत सभागृहात,
नाशिक, 08 ऑगस्ट (हिं.स.) - नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांवरून महानगरपालिकेच्या विशेष महासभेमध्ये नगरसेवक संतप्त झाले असून सभेला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस थेट ॲम्बुलन्स सह दाखल झाले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापौरांसमोरील मोकळ्या जागेत रुग्णांच्या वेशभूषा करून आंदोलन करण्यात आले. यावर महापौरांनी नगरसेवकांना शांत करत महासभेला सुरुवात केली.
नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती खड्ड्यांच्या साम्राज्य निर्माण झालेला आहे त्यामुळे नाशिकवासीय त्रस्त झाले असून यातून काही जणांचे अपघात होऊन ते जेरबंद झाले आहेत तर काही जणांचा मृत्यू झाला आहे या सर्व प्रश्नावरती शनिवारी नाशिक महानगरपालिकेची विशेष सभा बोलविण्यात आली होती या सभेला सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक मुकेश शहाणे, गटनेते सीमा ठाकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲम्बुलन्स सह सभागृहात रुग्णांची वेशभूषा करत दाखल झाले त्यांचे आंदोलन सुरू असताना महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी महासभा सुरू केली तर सभागृहात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक केशव पोरजे, वैशाली दाणी, भारती ताजनपुरे, शैलेश ढगे, यांच्यासह इतर नगरसेवक रुग्णांची वेशभूषा करून महापौरांच्या आसनासमोर असलेल्या मोकळ्या जागेमध्ये दाखल झाले त्यांनी घोषणाबाजी करत या सर्व प्रश्नावरती चर्चा करावी कारवाई करावी अशी मागणी केली तर महापौरांच्या समोर मोकळ्या जागेमध्ये शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक जमा झाल्यानंतर भाजपाचे नगरसेवक अजिंक्य साने, भुषण राणे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, छाया देवांग, यांच्यासह इतर नगरसेवक व्यासपीठावरती चढले या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये महापौरांनी शिवसेना नगरसेवकांना शांत करत सर्व प्रश्नांवर चर्चा होणार आहे असे सांगून त्यांना जागेवर बसण्यास सांगितले त्यानंतर शिवसेना नगरसेवक जागेवरती बसले आणि प्रत्यक्ष सभेला पुन्हा या गोंधळानंतर सुरुवात झाली. खड्ड्यांच्या प्रश्नावरून असलेल्या या सभेमध्ये काय निर्णय होतो हे ऐकण्यासाठी नाशिक शहरातील नागरिकांनी देखील प्रेक्षक गॅलरीमध्ये चांगलीच गर्दी केलेली दिसून आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI