सोलापूरसह महाराष्ट्रातील विडी कामगारांच्या किमान वेतनाच्या मागणीला यश
सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।सोलापूरसह महाराष्ट्रातील विडी कामगारांच्या किमान वेतनाच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने विडी कामगारांसाठी झोन-१ मध्ये प्रतिदिन ₹३७९, तर झोन-२ मध्ये ₹३६१ किमान वेतन लागू असल्याचे स्पष्ट
सोलापूरसह महाराष्ट्रातील विडी कामगारांच्या किमान वेतनाच्या मागणीला यश


सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।सोलापूरसह महाराष्ट्रातील विडी कामगारांच्या किमान वेतनाच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने विडी कामगारांसाठी झोन-१ मध्ये प्रतिदिन ₹३७९, तर झोन-२ मध्ये ₹३६१ किमान वेतन लागू असल्याचे स्पष्ट केले आहे. शासनाने यापूर्वी निश्चित केलेले हे वेतनदर कायदेशीरदृष्ट्या वैध आणि अंमलबजावणीयोग्य असल्याचा विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मिळाल्यानंतर किमान वेतनाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली लाल बावटा विडी कामगार युनियन आणि CITUच्या माध्यमातून गेल्या जवळपास २९ वर्षांपासून विडी कामगारांच्या किमान वेतनासाठी संघर्ष सुरू होता. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर दत्तनगर येथील CITUच्या मध्यवर्ती कार्यालयात हजारो विडी कामगारांच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande