यवतमाळमध्ये दोन वर्षांत 75 लाखांचा खर्च तरीही 24 उद्यानांची दुरवस्था
यवतमाळ, 09 ऑगस्ट (हिं.स.) विकेंडला परिवारासह फिरण्यासाठी विरंगुळ्याचे ठिकाण नाही शहरात २८ उद्याने आहेत, त्यांच्या देखभालीसाठी दोन वर्षात सुमारे ७५ लाख खर्चही केले आहेत. मात्र असे असताना दोन- चार वगळता इतर उद्यानाची दयनीय अवस्था झाल्याचे दिसून
दोन वर्षांत 75 लाखांचा खर्च तरीही 24 उद्यानांची दुरवस्था:विकेंडला परिवारासह फिरण्यासाठी विरंगुळ्याचे ठिकाण नाही


यवतमाळ, 09 ऑगस्ट (हिं.स.)

विकेंडला परिवारासह फिरण्यासाठी विरंगुळ्याचे ठिकाण नाही

शहरात २८ उद्याने आहेत, त्यांच्या देखभालीसाठी दोन वर्षात सुमारे ७५ लाख खर्चही केले आहेत. मात्र असे असताना दोन- चार वगळता इतर उद्यानाची दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येते.

शहरात पूर्वी शिवाजी उद्यान आणि नेहरुउद्यान ही दोनच मोठी उद्याने होती. त्या ठिकाणी सुटीच्या दिवशी शहरवासी विरंगुळा म्हणून वेळ घालवण्यासाठी जायचे. मात्र मागील काही वर्षात त्या उद्यानांचीही दयनीय अवस्था झालेली आहे.सध्या शहरात या दोन उद्यानांसह ५ मोठी, लहान अशी २८ उद्याने असल्याची नोंद पालिकेच्या नियोजन विभागाकडे आहे. त्या उद्यानांच्या देखभालीसाठी या वर्षी खर्चाचे नियोजन केले आहे. दरवर्षी उद्यानांच्या देखभाल दुरूस्तीसाठी हा खर्च होत असताना उद्यानांची दयनीय झाली असल्याचे दिसते. त्यामुळे या उद्यानांत फिरण्यासाठी जाणेही शहरवासीयांना शक्य नाही. उद्यानांशिवाय इतर दुसरे कुठले ठिकाण शहरात नाही हे महत्वाचे.शहरातील नागरिकांना विकेंडला परिवारासह फिरण्यासाठी जाता येईल, असे एकही विरंगुळ्याचे ठिकाण शहरात नाही. सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी सुस्थितीत असलेले एखादे उद्यानही नाही. शहरवासीयांना घरी आलेल्या पाहुण्यांना फिरायला न्यायचे असल्यास किंवा परिवारासह सुटीचा दिवस घालवायचा असल्यास शहर सोडून इतर ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे अनेकांची धाव नागपूर, अमरावतीकडे असते. याशिवाय पांढरकवडा तालुक्यात असलेल्या टीपेश्वरकडे नागरिकांचा ओढा असतो. मात्र शहरात असे कुठलेही विरंगुळ्याचे ठिकाण नाही ही खंत आताही शहरवासीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. संकट मोचन परिसरात पर्यटन विकास निधीमधून ५ कोटी मंजुर करुन संकट मोचन तलावाच्या काठावर पर्यटनस्थळ विकसित करण्याचे काम सुरू केले होते. मात्र निधीअभावी हे काम काही वर्ष रखडले होते. आता या कामाचा बराच भाग आटोपला असला तरी अद्यापपर्यंत हे ठिकाण नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले नाही हे विशेष.

नालीवरुन उडी मारुन जावे लागते उद्यानात शिवाजी उद्यान शहराच्या मध्यभागी असल्याने या ठिकाणी आताही काहीजण जातात. मात्र या उद्यानामध्ये प्रवेश करण्यासाठी उद्यानाच्या समोर असलेल्या मोठ्या ओट्यावर नालीवरुन उड्या मारुन नागरिकांना जावे लागते. त्या ठिकाणी साध्या पायऱ्या देखील तयार करण्यात आलेल्या नाही. इतकेच नव्हे तर उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांनी दुकाने थाटल्याचे पाहायला मिळत आहे.

तारांगणाचे स्वप्न ठरले औक घटकेचे लहान मुलांना अवकाशासंदर्भात महत्वाची माहिती मिळावी, या उद्देशाने शहरातील नेहरु उद्यान परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करुन तारांगण तयार करण्यात आले आहे. मात्र योग्य देखभाल आणि कंत्राटदार व पालिका प्रशासन यांच्या असमन्वयामुळे हे तारांगण दीर्घ काळासाठी कधीही सुरू झाल्याचे पाहायला मिळाले नाही. याच ठिकाणी तयार करण्यात आलेला अॅडव्हेन्चर पार्कही कधी मुलांना खेळण्यासाठी सुरू करण्यात आला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande