अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचा ऐतिहासिक टप्पा, ३५०० यशस्वी सांधेरोपण शस्त्रक्रिया पूर्ण
नाशिक, 09 ऑगस्ट (हिं.स.)। : उत्तर महाराष्ट्रातील सांधेरोपण (Joint Replacement) शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या अस्थिरोग विभागाने ३५०० यशस्वी जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आ
Ashoka Medicover Hospital's


नाशिक, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

: उत्तर महाराष्ट्रातील सांधेरोपण (Joint Replacement) शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या अस्थिरोग विभागाने ३५०० यशस्वी जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या उल्लेखनीय यशानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘मूव्हमेंटम २०२६’ हा विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात अस्थिरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर, विविध विभागांचे वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग व पॅरामेडिकल कर्मचारी तसेच सांधेरोपण शस्त्रक्रिया झालेल्या अनेक रुग्णांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

हा कार्यक्रम केवळ यशाचा उत्सव नसून, सांधेरोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी पुन्हा आनंदी, सक्रिय आणि निरोगी जीवन कसे जगावे, याचा अनुभव देण्यासाठी विशेषरित्या आयोजित करण्यात आला होता. यावेळी रुग्णांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ, मजेदार उपक्रम, संवाद सत्रे आणि सहभागात्मक अॅक्टिव्हिटीजचे आयोजन करण्यात आले. रुग्णांनी या उपक्रमांमध्ये मनमोकळेपणाने सहभाग घेत शस्त्रक्रियेनंतर मिळालेल्या वेदनामुक्त आयुष्याचा आनंद सर्वांसोबत व्यक्त केला.

अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. जयेश सोनजे म्हणाले, ३५०० यशस्वी जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांचा टप्पा हा केवळ एक आकडा नसून हजारो रुग्णांच्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. गुडघेदुखी, खुबेदुखी किंवा सांध्यांच्या झिजेमुळे अनेक रुग्णांना चालणे, जिने चढणे किंवा दैनंदिन कामे करणेही कठीण होते. मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञान, अचूक शस्त्रक्रिया आणि प्रभावी पुनर्वसनाच्या मदतीने हेच रुग्ण पुन्हा आत्मविश्वासाने चालू लागतात, प्रवास करतात आणि आपल्या आवडत्या गोष्टी करू लागतात. रुग्णाच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि त्याच्या आयुष्यात परतलेली हालचाल हेच आमच्यासाठी सर्वात मोठे यश आहे.

अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सागर काकतकर म्हणाले, सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाचे इम्प्लांट्स आणि अनुभवी शल्यचिकित्सक यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. आज अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता उरलेली नाही. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत जाधव म्हणाले, जॉइंट रिप्लेसमेंट म्हणजे केवळ शस्त्रक्रिया नाही, तर रुग्णाला पुन्हा आत्मविश्वासाने उभे करण्याचा आणि त्याचे जीवन पूर्ववत करण्याचा प्रवास आहे. योग्य निदान, योग्य वेळी शस्त्रक्रिया, प्रभावी फिजिओथेरपी आणि रुग्णाचा सकारात्मक सहभाग यामुळे उत्कृष्ट परिणाम मिळतात.

अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सुपे म्हणाले, योग्य वेळी उपचार घेतल्यास त्यांना पुन्हा चालण्याचा, फिरण्याचा आणि आनंदाने जीवन जगण्याचा आत्मविश्वास मिळतो. आज 'मूव्हमेंटम २०२६'मध्ये रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे की, योग्य उपचारामुळे आयुष्याला खऱ्या अर्थाने नवी दिशा मिळू शकते.

३५०० यशस्वी सांधेरोपण शस्त्रक्रियांचा टप्पा हा संपूर्ण अशोका मेडिकव्हर परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे यश केवळ आमच्या अस्थिरोग विभागाचे नसून डॉक्टर, भूलतज्ज्ञ, नर्सिंग टीम, फिजिओथेरपिस्ट, तांत्रिक कर्मचारी आणि प्रत्येक सहकाऱ्याच्या समर्पित टीमवर्कचे फलित आहे. 'मूव्हमेंटम २०२६' सारख्या उपक्रमांमागील आमचा उद्देश रुग्णांना केवळ उपचार देणे नाही, तर त्यांना पुन्हा आनंदाने, आत्मविश्वासाने आणि निरोगीपणे जीवन जगण्याची प्रेरणा देणे हा आहे. रुग्णांचा आमच्यावर असलेला विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद असून, भविष्यातही उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाचे अस्थिरोग उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

- अनुप त्रिपाठी, सेंटर हेड अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande