बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी कोरफळे शिवारात; जलपूजनावेळी आनंदाश्रू अनावर
सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।अवर्षणग्रस्त बार्शी तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी अखेर कोरफळे शिवारात पोहोचले आहे. तब्बल ५० वर्षांपासून पाहिलेले शेतीपाण्याचे स्वप्न साकार झाल्याचे पाहून शेतकरी बांधवांच्या उप
Kurnur dam


सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।अवर्षणग्रस्त बार्शी तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी अखेर कोरफळे शिवारात पोहोचले आहे. तब्बल ५० वर्षांपासून पाहिलेले शेतीपाण्याचे स्वप्न साकार झाल्याचे पाहून शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत जलपूजन करताना आमदार राजेंद्र राऊत भावूक झाले.

यावेळी त्यांना आनंदाश्रू अनावर झाले.जलपूजनानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, “काही कामे ही केवळ राजकीय नसतात, तर ती अंतर्मनाला खरा आनंद देणारी असतात. ज्या बार्शीतील बळीराजाने मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, त्यांच्या चेहऱ्यावरील सुख, समाधान आणि आनंद मला अहोरात्र काम करण्याची ऊर्जा देतो.”ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रखडलेल्या सिंचन योजना मार्गी लागल्या आहेत. संपूर्ण अवर्षणग्रस्त बार्शी तालुका हिरवागार केल्याशिवाय आता मी स्वस्थ बसणार नाही.”बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी कोरफळे शिवारात पोहोचल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या योजनेमुळे शेतीसाठी शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध होण्यास मदत होणार असून, बार्शी तालुक्यातील शेतीचे चित्र बदलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande