दागिने लुटणाऱ्या टोळीच्या बीड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
बीड, 09 ऑगस्ट (हिं.स.)। बीड स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत हरिद्वारला व्यावसायिकास नेण्याच्या बहाण्याने सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ₹76.93 लाखांचा मुद्देमाल जप
पोलीस कारवाई


बीड, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

बीड स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत हरिद्वारला व्यावसायिकास नेण्याच्या बहाण्याने सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ₹76.93 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना २ ऑगस्ट रोजी घडली होती. फिर्यादी रमेश उप्पदवार यांना हरिद्वारला जाण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून आरोपींनी त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने लुटून पसार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे रोहन उर्फ बाबी संजय गुप्ते याला ताब्यात घेतले. आरोपीकडून चोरीतील सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार आणि इतर साहित्य असा ₹76 लाख 93 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande