अमरावती : कारागृहात चित्रीकरण करणाऱ्या मजुराविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती, 09 ऑगस्ट (हिं.स.) | जिल्हा मध्यवर्ती कारागृह परिसरात नवीन प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू आहे. त्यावर उभे राहून आतील चित्रीकरण करणाऱ्या बांधकाम मजुराविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरीफ खान आबीद खान (वय २२, रा. लालखडी, फातीम
कारागृहात चित्रीकरण करणाऱ्या मजुराविरुद्ध गुन्हा दाखल


अमरावती, 09 ऑगस्ट (हिं.स.) | जिल्हा मध्यवर्ती कारागृह परिसरात नवीन प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू आहे. त्यावर उभे राहून आतील चित्रीकरण करणाऱ्या बांधकाम मजुराविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरीफ खान आबीद खान (वय २२, रा. लालखडी, फातीमानगर), असे चित्रीकरण करणाऱ्या मजुराचे नाव असल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांनी दिली आहे.

कारागृहाच्या परिसरात नवीन प्रवेशद्वारावर चढून आरीफ खान हा त्याच्या मोबाईलने आतील चित्रीकरण करीत असल्याची बाब ड्यूटीवर तैनात पोलिस कर्मचारी विपीन छगनराव राठोड (वय ३७) यांच्या निदर्शनात आली. त्यांनी आरीफ खान याला जाब विचारला. वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. कारागृह कर्मचाऱ्यांनी संशयित आरीफ खान आबीद खान याचा मोबाईल जप्त केला आहे. आरीफ खान याने मोबाईलने आतील व्यवस्थेचे चित्रीकरण कुणाच्या सांगण्यावरून व कशासाठी केले, याची चाचपणी फ्रेजरपुरा पोलिसांनी सुरू केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे कारागृहाच्या आत प्रवेश करतानाच कडक तपासणी केल्या जाते. आत जाणारे वाहन, मजूर असो किंवा कर्मचाऱ्यांना आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा नेण्यास बंद आहे. असे असताना संशयित आरीफ खान याने मोबाईलने चित्रीकरण केल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande