
चंद्रपूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।
ओबीसींच्या आरक्षणासह संविधानिक हक्कांवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. अशा परिस्थितीत बहुजन-ओबीसी समाजाने भावनिक राजकारणाला बळी न पडता आपल्या हक्कांसाठी निर्णायक संघर्ष उभारला पाहिजे, असा हल्लाबोल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
चंद्रपूर येथे आयोजित ओबीसी मंडल यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. भंडारा येथून सुरू झालेल्या या यात्रेदरम्यान ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर जनजागृती करण्यात आली.
समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख कवी नितीन चंदनशिवे यांनी आपल्या प्रभावी वकृत्वशैलीत सरकारच्या बहुजनविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली.
या समारोपीय कार्यक्रमास पदवीधर शिक्षक आमदार अभिजित वंजारी, प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे, मंडल यात्रा संयोजक उमेश कोराम, काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर, विनायक बांगडे तसेच ओबीसी मंडल यात्रेतील सर्व कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव