छत्रपती संभाजी नगर येथे क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना विनम्र अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, 09 ऑगस्ट (हिं.स.)छत्रपती संभाजी नगर येथे क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांची प्रामुख्याने यावेळी उपस्थिती होती.क्रांती दिनानिमित्त लाडसावंगी, ता. छत्रपती
छत्रपती संभाजी नगर येथे क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना विनम्र अभिवादन


छत्रपती संभाजीनगर, 09 ऑगस्ट (हिं.स.)छत्रपती संभाजी नगर येथे क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांची प्रामुख्याने यावेळी उपस्थिती होती.क्रांती दिनानिमित्त लाडसावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर येथील हुतात्मा स्मारकास भेट देऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानामुळेच आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. त्यांच्या शौर्याची प्रेरणा भावी पिढ्यांना सदैव मिळत राहावी, हीच त्यांना खरी आदरांजली आहे. असे खासदार काळे म्हणाले.

यावेळी म्हस्के परिवार, हातमाळी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. हुतात्म्यांचे बलिदान आणि स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग सदैव प्रेरणादायी राहील. असे त्यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande