मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर येणार
छत्रपती संभाजीनगर, 09 ऑगस्ट (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी माहिती दिली. तिरंगा यात्रेच्या निमित्ताने मु
अ


छत्रपती संभाजीनगर, 09 ऑगस्ट (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी माहिती दिली. तिरंगा यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजी नगर शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. ’तिरंगा यात्रे’निमित्त भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय येथे माजी सैनिकांची बैठक संपन्न झाली..

मंत्री अतुल सावे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. तसेच माजी सैनिकांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थिती होती मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या यात्रेचे नियोजन अधिक शिस्तबद्ध व्हावे यासाठी सर्वांशी चर्चा केली. तिरंगा यात्रेच्या निमित्ताने नागरिकांनाही यामध्ये सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande