
नाशिक, 09 ऑगस्ट (हिं.स.)।
: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी टीकाकारांना थेट प्रत्युत्तर देत कुंभमेळ्याला बदनाम करू नका’, असे आवाहन केले. कुंभमेळ्याच्या कामांसाठी मोठी स्पर्धा झाली असून त्यातून ठेके देण्यात आले आहेत. एखादा गुजराथी ठेकेदार असल्याची माहिती आपण घेतली असल्याचे सांगत केवळ त्यावरून आरोप करणे योग्य नसल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. संजय राऊत हे वारंवार टीका करत आहेत, त्यांनी नाशिकमध्ये येऊन आंदोलन करावे, असेही त्यांनी सुनावले.
नाशिक दौऱ्यात ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, त्यांच्या सर्व कामांचे आदेश देण्यात आले असून मागण्या पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. कुंभकाळात साधू-महंतांची सर्व कामे पूर्ण झालेली असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याबाबत फडणवीस म्हणाले की, मलाही धक्का जाणवला. नागरिक घराबाहेर पडल्याने घबराट निर्माण झाली होती; मात्र भूकंपाचे धक्के नॉर्मल असून नागरिकांनी घाबरू नये. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या विमान प्रवासाबाबत बोलताना, कोणीही एकत्र प्रवास करू शकतो. या प्रवासात कोणतेही राजकारण पाहिले जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. सुप्रिया सुळे यांच्या भेटीबाबत, त्या मला का भेटत आहेत याची कल्पना नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमली असून स्थानिकांची मागणी काय आहे, यावर सरकार लक्ष घालत आहे. समितीचा अहवाल वेळेत घेऊन निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. अंबादास दानवे यांच्याबाबत फडणवीस म्हणाले की, ते जुने स्वयंसेवक असून त्यांच्यासोबत युवा मोर्चाचे काम केले आहे. त्यामुळे ते RSS चे कार्यकर्ते असतील, तर त्यात गैर वाटत नाही, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI