लातूर - शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच संगमेश्वर जनगावे बिनविरोध
लातूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द (खुर्दळी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची पुनर्रचना नुकतीच करण्यात आली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच संगमेश्वर जनगावे यांची बिनविरोध नि
पक्षप्रवेश


संगमेश्वर जणगावे


लातूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द (खुर्दळी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची पुनर्रचना नुकतीच करण्यात आली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच संगमेश्वर जनगावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींच्या एकमतातून झालेल्या या निवडीमुळे शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठन बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख एस. पी. केंद्रे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रचिता भोसले, उपसरपंच रमेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रयागबाई नरहरे, ह.भ.प. मोहन महाराज उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनासंदर्भातील नियमावली व मार्गदर्शक तत्त्वांची माहिती गटसाधन केंद्राचे विषय साधन व्यक्ती पी. एम. भालके यांनी दिली. यावेळी ह.भ.प. मोहन महाराज, उपसरपंच रमेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव, किराणा व्यापारी भालचंद्र हाके, माजी अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे आणि ज्ञानेश्वर जाधव यांनी मनोगत व्यक्त करत समितीची निवड बिनविरोध करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर सर्वानुमते संगमेश्वर जनगावे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

नूतन कार्यकारिणी अशी :

उपाध्यक्ष : कार्तिक स्वामी.

सदस्य : प्रशांत जाधव, अर्चना जाधव, नसरीन शेख, आसमा सय्यद, सुरेखा कांबळे, मच्छिंद्र भालेराव, प्रीती सूर्यवंशी, सोनाजी हाके, स्वाती तिवडे, अन्नपूर्णा नरहरे, ज्ञानोबा सूर्यवंशी.

ग्रामपंचायत प्रतिनिधी : गणपती जाधव.

शिक्षणतज्ज्ञ : सुशीलकुमार शिंदे.

अंगणवाडी प्रतिनिधी : सुनिता चामले.

शिक्षक प्रतिनिधी : नंदा नरहरे.

विद्यार्थी प्रतिनिधी : वेदा जाधव, आयान शेख.

नूतन शालेय व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीचा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा, शाळेच्या भौतिक विकासाला चालना तसेच पालक-शिक्षक-ग्रामस्थ यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी समिती प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी मुख्याध्यापक जगन्नाथ वाघलगावे, दत्तात्रय मद्रेवार, पांडुरंग हाके, शालिनी वट्टमवार, रंजना हळनर, करूना शिंदे, रंजना नरहरे, संजयकुमार भोसले, ॲड. बी. एम. जनगावे, रमजान शेख, मारुती तिवडे, सूर्यकांत जवणे, लियाकतबी शेख, अच्युतराव नरहरे, मेघराज नरहरे, सोमेश्वर सोनटक्के यांच्यासह मोठ्या संख्येने पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande