
नांदेड, 09 ऑगस्ट (हिं.स.)।
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठ्याच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आमदार बोंढारकर यांनी तरोडा नाका येथील महावितरणच्या कार्यालयात संयुक्त बैठक घेतली.
बैठकीत महावितरण मधील ग्राहकांचे प्रश्न आणि अडचणी समजून घेतल्या त्या दूर करण्याच्य सूचना त्यांनी केल्या
. दक्षिण विधानसभा मतदारसंघात वीज पुरवठ्याच्या संदर्भात कोणताही प्रश्न उपस्थित झाला नाही पाहिजे असे त्यांनी सांगितले. बैठकीस अधीक्षक अभियंता संजय खंदारे, कार्यकारी अभियंता शैलेश कलंत्री, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. एन. कांबळे, शिवसेना शहर प्रमुख तुलजेश यादव, युवासेना जिल्हाप्रमुख बाळु पाटील मोरे, महानगरप्रमुख दिपक स्वामी, संतोष जाधव, सहायक अभियंते बळीराम तोडेवाड, तुषार वाघमारे, पुंजाजी साखरे, दालधन मोरे, प्रियांका तामलवाड, राखे यांच्यासह नांदेड दक्षिण मतदारसंघातील महावितरणचे सर्व लाईनमन उपस्थित होते...
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis