
मुंबई, 09 ऑगस्ट (हिं.स.)।'मराठी मुलींना ग्लॅमरस जगतात पाऊल ठेवण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या स्वप्नांना संधीचे, यशाचे पंख मिळावेत यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘श्रावणक्वीन’ या स्पर्धेची सुरुवात केली. यंदा स्पर्धेचे १८ वे वर्ष. या व्यासपीठावर होते तुमच्या क्षमता आणि गुणवत्तांची पारख. सौंदर्य, बुद्धिमत्ता, आत्मविश्वास आणि गुणवत्तेचा मिलाफ तुमच्यामध्ये आहे असे वाटत असेल, तर ही स्पर्धा नक्कीच तुमच्यासाठी आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकमध्ये रंगते. चित्रपट, टीव्ही, नाटक आणि फॅशन जगतातील प्रतिथयश कलाकार पारख करतात सर्वोत्तम सौंदर्यवतींची. मराठी मुलींच्या स्वप्नांना पंख देण्याचे आणि उडण्यासाठी दिशा दाखवण्याचे काम गेल्या १८ वर्षांपासून ‘श्रावणक्वीन’ स्पर्धा करत आहे. यंदा तुम्हालाही मिळू शकेल, ही संधी. मग तयार ना?
११ ऑगस्ट, दुपारी १२ वाजेपर्यंत सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर