संदीपभैय्याच्या नेतृत्वाखाली अनेकाचा राष्ट्रवादी काँग्रेस (शप) मध्ये प्रवेश
बीड, 09 ऑगस्ट (हिं.स.)। आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बीड विधानसभा मतदारसंघातील अनेकांनी आज रविवारी (दि.९) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी भवन येथे आ. संदीप क्षीरसागर यांनी सर्वांचे स्वागत केले. राष्ट्रवा
पक्षप्रवेश


बीड, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बीड विधानसभा मतदारसंघातील अनेकांनी आज रविवारी (दि.९) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी भवन येथे आ. संदीप क्षीरसागर यांनी सर्वांचे स्वागत केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पार्टीचे आ. संदीप क्षीरसागर यांचे मतदारसंघातील संपर्क आणि प्रत्यकाच्या अडिअडचणी सोडविण्यासाठीची, विकासासाठी सुरू असलेली धावपळ पाहता या कामाने आणि देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आज रविवारी बीड विधानसभा मतदारसंघातील खापरपांगरी येथील माजी सरपंच सुधाकर चव्हाण, माजी सरपंच विक्रम शेंडगे, निवृत्ती बटारे, दिलीप आजबे, अनिल शिंदे,

लक्ष्मण कदम, बाळू काटकर, गहिनीनाथ आजबे, पिनु शेंडगे, भारत शेंडगे, भगवाण चव्ह, बंडू आजबे, भरत मिसाळ, महादेव चव्हाण, विसू शेंडगे, बळीराम शेंडगे, संदिप आजबे, संदिपान शेंडगे, बालाजी शेंडगे, विठ्ठल शेंडगे, अशोक दोरमारे, अविनाश मिसाळ, बाबू चव्हाण, राजेंद्र माने, सागर खामकर, वैभव चव्हाण, बाबू चव्हाण यांच्यासह इतरांनी पक्षप्रवेश केला

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande