
नांदेड, 09 ऑगस्ट (हिं.स.)
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्र. ४ हनुमान गड येथील मंदिरात वृक्षारोपण व पेवरच्या कामाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. महानगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामांचा आढावा त्यांनी घेतला. महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करण्यावर त्यांनी भर दिला. वृक्षारोपणाच्या निमित्ताने नांदेड शहर एक चांगले सुंदर शहर होणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी उपस्थित आमदार अमरनाथ राजूरकर महापौर सौ कविता संतोष मुळे, माजी महापौर बलवंतसिंग गाडीवाले, माजी महापौर सौ. शैलेजा किशोर स्वामी, माजी महापौर सौ. जयश्री निलेश पावडे, सभागृह नेता ॲड. महेश कनकदंडे, सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले, माजी सभापती किशोर स्वामी, महिला बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी, नगरसेवक प्रशांत तिडके, नगरसेवक संदीपसिंग गाडीवाले, नगरसेवक सुहास कल्याणकर, नगरसेवक दयानंद वाघमारे, नगरसेविका सौ. सरिता देशमुख बीरकले, आयुक्त महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis