छ. संभाजीनगर - सांस्कृतिक विकासासाठी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जाणीव-जागृती मेळाव्याचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जाणीव-जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात समाजातील ना
अ


छत्रपती संभाजीनगर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जाणीव-जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात समाजातील नागरिक, युवक, महिला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आदिवासी समाजासमोरील विविध प्रश्न, शासनाच्या योजना, शैक्षणिक संधी, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

शिक्षण हेच सक्षम आणि स्वावलंबी समाजाच्या निर्मितीचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

आपली समृद्ध परंपरा, संस्कृती आणि अस्मिता जपत आधुनिक शिक्षण व विकासाच्या प्रवाहात पुढे जाणे, हीच आजच्या काळाची गरज आहे. समाजातील युवकांनी शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी आयोजक श्री. अशोक बर्डे यांच्यासह गोरखराव पवार, मराठवाडा अध्यक्ष विनोद बोबले, भुषण कावसानकर, संजय लघाने, उपसभापती पंचायत समिती पैठण, पोपटराव औटे, राजू गायकवाड, मनोज गायके, विलास आडसुल, सलीम भाई, भागवत गिरगे, आबासाहेब गिरगे, रघुनाथ इछैय्या, नवनाथ हजारे, शुभम इंगळे यांच्यासह आदिवासी समाजातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande