ट्रॅफिक मॅनेजमेंट, रोड सेफ्टीवर विद्यार्थ्यांचा पीएमआरडीएकडे अभ्यासपूर्ण प्रस्ताव
पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)। रस्त्यांच्या कामांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीसह सुरक्षाविषयक समस्यांवर उपाययोजना सुचवीत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ‘ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि रोड सेफ्टी’ विषयावरील संशोधनाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी मा
PMRDA


पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)। रस्त्यांच्या कामांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीसह सुरक्षाविषयक समस्यांवर उपाययोजना सुचवीत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ‘ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि रोड सेफ्टी’ विषयावरील संशोधनाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नागरिकांच्या सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे स्पष्ट केले.सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच पीएमआरडीए कार्यालयाला भेट दिली. यावेळी सनीज वर्ल्ड ते सिम्बायोसिस, लवळे या रस्त्याच्या कामासंदर्भातील विविध अडचणी आणि समस्यांकडे विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्ते कामांमुळे वाहतुकीवर होणारा परिणाम, सुरक्षेचे प्रश्न तसेच वाहनचालक आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत विद्यार्थ्यांनी निरीक्षणे मांडली.रस्त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासोबतच सार्वजनिक सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश आयुक्त डॉ. चौधरी यांनी अभियांत्रिकी विभागाला दिले.पीएमआरडीएचे मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, कार्यकारी अभियंता वसंत नाईक आणि उपअभियंता अमित तिडके यांनी विद्यार्थ्यांकडून रस्त्याशी संबंधित समस्या जाणून घेतल्या. संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.या वेळी डॉ. सायली सांडभोर, प्रा. हुमेरा खान, डॉ. संजीव कदम यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पीएमआरडीएच्या विविध प्रकल्प आणि कामकाजाची माहितीही घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande