अंबाजोगाईत कल्याण मटका जुगारावर दोन ठिकाणी धाडी; २८ हजारांहून अधिक रोकड-मोबाईल जप्त
बीड, 09 ऑगस्ट (हिं.स.)अंबाजोगाई शहरात सुरू असलेल्या अवैध कल्याण मटका जुगारावर शहर पोलिसांनी सलग दोन ठिकाणी धाडी टाकत मोठी कारवाई केली आहे. या दोन्ही कारवायांमध्ये रोकड रकमेसह दोन महागडे मोबाईल असा एकूण ४३ हजारांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्
अंबाजोगाईत कल्याण मटका जुगारावर दोन ठिकाणी धाडी; २८ हजारांहून अधिक रोकड-मोबाईल जप्त


बीड, 09 ऑगस्ट (हिं.स.)अंबाजोगाई शहरात सुरू असलेल्या अवैध कल्याण मटका जुगारावर शहर पोलिसांनी सलग दोन ठिकाणी धाडी टाकत मोठी कारवाई केली आहे. या दोन्ही कारवायांमध्ये रोकड रकमेसह दोन महागडे मोबाईल असा एकूण ४३ हजारांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्याचाच भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार छत्रपती संभाजी महाराज चौक, लातूर टी-पॉईंट, अंबाजोगाई परिसरात एक इसम कल्याण मटका जुगार खेळवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी जाऊन कारवाई केली.

यावेळी आशिष भैय्यासाहेब कोकाटे (वय २७, रा. पळसखेडा, ता. केज, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून कल्याण मटका जुगाराची रोकड १ हजार ७२० रुपये तसेच अंदाजे १५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, असा एकूण १६ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सोमेश्वर हॉस्पिटलसमोर, सरस्वती हॉटेलच्या परिसरात कल्याण नावाचा मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी दुसरी धडक कारवाई केली.

या कारवाईत मधुकर मुकिंदा हजारे (वय ६८, रा. कबीरनगर, रिंग रोड, अंबाजोगाई) याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून कल्याण मटका जुगाराची १ हजार ११० रुपयांची रोकड आणि २५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, असा एकूण २६ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर ३२४/२०२६, कलम १२(अ), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध धंद्यांविरोधात मोहीम तीव्र

अंबाजोगाई शहरात पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात कारवाईला वेग आल्याचे दिसून येत आहे. मटका, जुगार यासह अवैध व्यवसायांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.

या दोन्ही कारवायांमुळे शहरात “अवैध धंदे चालवायचे असतील तर पोलिसांची नजर चुकवणे आता सोपे नाही”, असा संदेश गेला आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande