रायगड जिल्हा बॅंकेच्या ८ हजार कोटींच्या व्यवसायाची आरबीआयकडून दखल
रायगड, 09 ऑगस्ट (हिं.स.)। रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्याची आणि प्रगतीची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष दखल घेतली. वित्तीय समावेशन, ग्रामीण भागातील बँकिंग सेवांचा विस्तार, सहकारी संस्थांचे सक्षमीकरण तसेच डिजिटल व आ
RBI-takes-note-of-business-wor


रायगड, 09 ऑगस्ट (हिं.स.)। रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्याची आणि प्रगतीची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष दखल घेतली. वित्तीय समावेशन, ग्रामीण भागातील बँकिंग सेवांचा विस्तार, सहकारी संस्थांचे सक्षमीकरण तसेच डिजिटल व आधुनिक बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून बँकेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले. रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने अलिबाग येथील बँकेच्या मुख्य कार्यालयाला भेट देऊन विविध उपक्रम व कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे ग्रामीण उद्योजकता व स्वयंरोजगाराला दिलेले पाठबळ तसेच २० हजारांहून अधिक महिला बचतगटांना केलेले आर्थिक सहकार्य याची साहू यांनी विशेष दखल घेतली. कशेळे, मजगाव, नाते, विन्हेरे, विळे, राजपुरी, संदेरी यांसारख्या ग्रामीण व दुर्गम भागांत शाखांचा विस्तार करून नागरिकांना बँकिंग सेवेशी जोडल्याबद्दलही त्यांनी कौतुक केले.

बँकेच्या ८ हजार कोटी रुपयांहून अधिक व्यवसायासह डिजिटल बँकिंग, सायबर सुरक्षा, रिस्क मॅनेजमेंट, ग्राहकाभिमुख सेवा आणि व्यवसायवृद्धीचा आढावा घेण्यात आला. सहकारी संस्थांचे संगणकीकरण करून त्यांना आधुनिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याच्या बँकेच्या पुढाकाराचेही कौतुक करण्यात आले.

रायगड डीसीसी बँकेचे कार्य सहकार क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरू शकते, असे मत साहू यांनी व्यक्त केले.

बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील, संचालक मंडळ, व्यवस्थापन तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे त्यांनी अभिनंदन केले. आगामी काळात AI, डेटा ॲनालिटिक्स, डिजिटल गव्हर्नन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सुरक्षित व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा बँकेचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande