सोलापूर : ओपीडीतच ५५ वर्षीय रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांच्या तत्परतेने जीवदान
सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।शहरातील रेल्वेलाईन परिसरातील हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या ५५ वर्षीय रुग्णाला ओपीडीमध्येच अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याची घटना आज दुपारी घडली. छातीत तीव्र वेदना होत असल्याने रुग्ण उपचारासाठी
सोलापूर : ओपीडीतच ५५ वर्षीय रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांच्या तत्परतेने जीवदान


सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।शहरातील रेल्वेलाईन परिसरातील हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या ५५ वर्षीय रुग्णाला ओपीडीमध्येच अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याची घटना आज दुपारी घडली. छातीत तीव्र वेदना होत असल्याने रुग्ण उपचारासाठी आले होते. तपासणी सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली. मात्र, हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केल्याने रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले.रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात येताच ओपीडी स्टाफने क्षणाचाही विलंब न करता आपत्कालीन उपचार सुरू केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अवघ्या काही सेकंदांत सीपीआर (Cardiopulmonary Resuscitation) सुरू करण्यात आले.हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर शैलेश पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत रुग्णाला सीपीआर दिला. त्यानंतर आवश्यकतेनुसार डीसी (Direct Current) शॉक अर्थात डिफिब्रिलेशन देण्यात आले. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या तत्पर उपचारामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णाला वेळेत आवश्यक वैद्यकीय मदत मिळाली.तीव्र हृदयविकाराच्या झटक्याच्या परिस्थितीत सुरुवातीचा वेळ अत्यंत महत्त्वाचा असतो. रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास तातडीने सीपीआर सुरू करणे आणि वैद्यकीय गरजेनुसार डिफिब्रिलेशनसह पुढील आपत्कालीन उपचार करणे महत्त्वाचे ठरते. या घटनेतही रुग्णाला वेळ न दवडता उपचार मिळाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात मदत झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande