पुणे : सोलर पॅनल अन् सबसिडीचे आमिष दाखवून १२.४४ लाखांची फसवणूक
पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)।पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवून देण्यासह शासनाकडून मिळणारी सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची तब्बल १२ लाख ४४ हजार २७४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेंद्र महादेव बो-हाडे (रा. घोडेगाव, ता
Solar News Pune


पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)।पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवून देण्यासह शासनाकडून मिळणारी सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची तब्बल १२ लाख ४४ हजार २७४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेंद्र महादेव बो-हाडे (रा. घोडेगाव, ता. आंबेगाव; सध्या रा. आळेफाटा, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध घोडेगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोलर पॅनल आणि शासकीय सबसिडीच्या नावाखाली आणखी नागरिकांची फसवणूक झाली आहे का, याचा तपासही घोडेगाव पोलिसांकडून सुरू आहे.

याबाबत लक्ष्मण मनाजी काचोळे (वय ६७, रा. पिंपळगाव घोडे, ता. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बो-हाडे याने आपण पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसविण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. या योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवल्यानंतर शासनाकडून ७८ हजार रुपयांची सबसिडी मिळते. तसेच योजनेची सर्व कागदपत्रे आणि प्रक्रिया आपणच पूर्ण करून देतो, असे सांगून त्याने फिर्यादींचा विश्वास संपादन केला.फिर्यादींच्या फार्महाऊसवर दोन महिन्यांत सोलर पॅनल बसवून देण्याचे आश्वासन देत बो-हाडे याने त्यांच्याकडून १ लाख ७० हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, त्यानंतर सोलर पॅनल बसवून न देता तसेच घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा आरोप आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande