शाहू महाराजांचे शेतकरी हितासाठीचे कार्य आधुनिक काळातही प्रेरणादायी - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
कोल्हापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.) - राजर्षी शाहू महाराजांनी शेतकरी हितासाठी केलेले कार्य आधुनिक काळातही अत्यंत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीनंतर आता पुढील टप्प्यातील कल्याणकारी क
कागल येथील शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार


कोल्हापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.) - राजर्षी शाहू महाराजांनी शेतकरी हितासाठी केलेले कार्य आधुनिक काळातही अत्यंत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीनंतर आता पुढील टप्प्यातील कल्याणकारी कामांना सुरुवात झाली असून, महाराष्ट्र विकासाच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, राजर्षींच्या या पावन भूमीत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी कटिबद्ध होण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार, कर्तृत्व आणि कागल तालुक्याशी संबंधित विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच, शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची सविस्तर माहिती त्यांनी या वेळी विशद केली.

समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या मनोगतात शेतकरी कर्जमुक्तीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी कागल तालुक्यात अत्यंत यशस्वीपणे सुरू असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कागल नगरपरिषदेच्या वतीनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, आमदार डॉ. विनय कोरे-सावकर, राहुल आवाडे, शिवाजीराव पाटील,

आमदार अशोकराव माने, कोल्हापूर महापालिका महापौर रूपराणी निकम, राजे समरजितसिंह घाटगे, कागल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सविता माने आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande