रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे ५ ते ८ सप्टेंबर श्रावण महोत्सव प्रदर्शन व विक्रीचे आयोजन
रत्नागिरी, 9 ऑगस्ट (हिं.स.) । उदयोन्मुख उद्योजिकांना व्यवसायाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे श्रावण महोत्सव प्रदर्शन व विक्रीचे आयोजन ५ ते ८ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. जयेश मंगल कार्यालयात हे प्रदर्शन हो
रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे ५ ते ८ सप्टेंबर श्रावण महोत्सव प्रदर्शन व विक्रीचे आयोजन


रत्नागिरी, 9 ऑगस्ट (हिं.स.) । उदयोन्मुख उद्योजिकांना व्यवसायाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे श्रावण महोत्सव प्रदर्शन व विक्रीचे आयोजन ५ ते ८ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले आहे.

जयेश मंगल कार्यालयात हे प्रदर्शन होणार आहे. गणेशोत्सवाच्या सणाची खरेदी याच महिन्यात एकाच छताखाली ग्राहकांना करता यावी आणि महिला उद्योजकांना आपल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने एकत्र येऊया... समृद्ध होऊया... या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध वस्तूंचे स्टॉल्स असणार आहेत.

या प्रदर्शनात स्टॉल नोंदणीसाठी उद्योजिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्टॉल बुकिंग आणि अधिक माहितीसाठी प्राची शिंदे यांच्या ९७६४४१७०७९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande