सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘नामविस्तार दिन’ उत्साहात साजरा
पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज विद्यापीठाचा ‘नामविस्तार दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्र
Nsjs


पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज विद्यापीठाचा ‘नामविस्तार दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, अधिसभा सदस्य प्रा. डॉ. राजेंद्र घोडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे, अधिष्ठाता डॉ. सदानंद बनसोडे, डॉ. रावसाहेब लटपटे, डॉ. धनंजय मंडलिक, विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय खरे, प्रा. डॉ. विलास आढाव, क्रांतीवीर बिरसा मुंडा अध्यासनाचे प्रमुख डॉ. अविनाश आडे यांसह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन १८४८ मध्ये भिडेवाड्यातून सुरू झालेल्या स्त्री शिक्षणाच्या चळवळीचा आणि सावित्रीबाईंच्या महान कर्तृत्वाचा सन्मान म्हणून ९ ऑगस्ट २०१४ रोजी विद्यापीठाचा नामविस्तार झाला होता, या ऐतिहासिक प्रवासाचा पुनरुच्चार कार्यक्रमात करण्यात आला. सावित्रीबाईंच्या विचारांचा वसा व वारसा जपत विद्यापीठाच्या प्रगतीची वाटचाल निरंतर सुरू ठेवण्याचा संकल्प या वेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande