सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जागतिक आदिवासी दिन’ उत्साहात साजरा
पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)। जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या आदिवासी समाजाच्या संस्कृतीचा व संघर्षाचा सन्मान करण्यासाठी ९ ऑगस्ट हा दिवस जगभरात ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच औचित्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील
Msns


पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या आदिवासी समाजाच्या संस्कृतीचा व संघर्षाचा सन्मान करण्यासाठी ९ ऑगस्ट हा दिवस जगभरात ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच औचित्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील क्रांतीवीर बिरसा मुंडा अध्यासनाच्या वतीने विद्यापीठात जागतिक आदिवासी दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचा गौरव करणाऱ्या स्फूर्तीदायी काव्यपंक्तींनी झाली. त्यानंतर क्रांतीवीर बिरसा मुंडा अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. अविनाश आडे आणि विभागप्रमुख व संचालक प्रा. डॉ. विलास आढाव यांच्या हस्ते क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी अधिसभा सदस्य प्रा. डॉ. राजेंद्र घोडे यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी समाजाचा ऐतिहासिक वारसा आणि बिरसा मुंडा यांचे विचार जपण्याचा संकल्प या वेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande