
बीड, 09 ऑगस्ट (हिं.स.)।
सनदी अधिकारी तुकाराम मुंडे बांच्या जीवनप्रवासावर आधारित ज्येष्ठ पत्रकार व लेखक शफी पठाण लिखित 'तुकाराम' या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी बीड येथील यशवंतराब चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. बिंदुसरा सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या पुढाकारातून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव भांडे यांनी दिली.
या सोहळ्यात प्रसिद्ध लेखक व वक्ते संजय आवटे हे प्रमुख बक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मनोहर चासकर, कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड हे राहणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis