
छत्रपती संभाजीनगर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। बिडकीन परिसरातील वाढता औद्योगिक व नागरी विस्तार लक्षात घेता गावठाण हद्दवाढ, रिंग रोड, वाहतूक व्यवस्था आणि मूलभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बिडकीन परिसरात औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळत असून त्यासोबतच लोकसंख्या आणि नागरी सुविधांची गरजही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गावठाण हद्दवाढ, रिंग रोड आणि वाहतूक व्यवस्थेसह पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावा घेतला.
बैठकीदरम्यान नागरिक, व्यापारी आणि विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांकडून समस्या व सूचनांची माहिती घेण्यात आली. प्रलंबित प्रश्नांची सद्यस्थिती जाणून घेत संबंधित विभागांनी समन्वयाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
बिडकीन परिसराचा नियोजनबद्ध, सर्वसमावेशक आणि नागरिककेंद्रित विकास साधण्यासाठी प्रशासनाकडून प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देण्यात येत आहे. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis