विशाल बालवाडकर माजलगाव नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी
बीड, 09 ऑगस्ट (हिं.स.)। माजलगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी विशाल दिलीप बालवाडकर यांची नियुक्ती झाली असून, त्यांच्या रूपाने नगरपरिषदेला नवे नेतृत्व लाभले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त स्पर्धा परीक्षा २
विशाल बालवाडकर


बीड, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

माजलगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी विशाल दिलीप बालवाडकर यांची नियुक्ती झाली असून, त्यांच्या रूपाने नगरपरिषदेला नवे नेतृत्व लाभले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त स्पर्धा परीक्षा २०२२ मधून त्यांची निवड झाली आहे

माजलगाव नगरपरिषदेसमोर सध्या अतिक्रमणे, अस्वच्छता, , रस्ते व नाल्यांची कामे, मालमत्ता नोंदी, नागरिकांच्या तक्रारी तसेच प्रशासकीय कामकाजातील दिरंगाई यांसारखे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे नव्याने पदभार स्वीकारणारे मुख्याधिकारी विशाल बालवाडकर यांच्यासमोर नगरपरिषदेतील

बेशिस्त कारभाराला आळा घालून प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देत ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा माजलगावकरांकडून व्यक्त होत आहे.

माजलगाव नगरपालिकेला आयएएस दर्जाचे दोन अधिकारी लाभले होते. त्यातील सध्या बीड जिल्हाधिकारी म्हणून असलेले विवेक जॉन्सन व दुसरे आदित्य जिवणे, या दोन्ही अधिकाऱ्यांनी माजलगाव शहराला शिस्त लावण्याचे काम केले आहे. त्याच पद्धतीने या नवीन अधिकाऱ्यानेही माजलगाव शहरात लावावी अशी नागरिकां कडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande