यवतमाळमधील शाळांजवळील ४० पानटपऱ्यांना पोलिसांची तंबी
यवतमाळ, 09 ऑगस्ट (हिं.स.)। शाळा, महाविद्यालयाच्या शंभर मीटर अंतरावरील पानटपऱ्या बंद करण्याची तंबी अवधूतवाडी पोलिसांनी दिली आहे. यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाला पत्र देण्यात आले असून, ४० हून अधिक पानटपऱ्या चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. अन्न व औ
शाळांजवळील ४० पानटपर्!यांना तंबी


यवतमाळ, 09 ऑगस्ट (हिं.स.)। शाळा, महाविद्यालयाच्या शंभर मीटर अंतरावरील पानटपऱ्या बंद करण्याची तंबी अवधूतवाडी पोलिसांनी दिली आहे. यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाला पत्र देण्यात आले असून, ४० हून अधिक पानटपऱ्या चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

अन्न व औषध विभागाचे सचिव म्हणून कार्यभार घेतल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी राज्यभर कारवाईचा धडाका चालू ठेवला आहे. खर्रा, गुटखा विक्रेत्यांसह भेसळ करणारे तसेच अस्वच्छता असलेल्या हॉटेल्सचालकांवर शेकडो कारवाया करण्यात आल्या आहेत. बहुतांश गुटखा विक्रेते भुमिगत झाले असून,अनेकांनी पानटपर्!यांचा व्यवसाय गुंडाळून ठेवला आहे. आता शाळा, महाविद्यालय परिसरात सुरू असलेल्या पानटपऱ्या चालकाकडे अन्न व औषध प्रशासनाने मोर्चा वळविला आहे. शाळा, महाविद्यालयाच्या शंभर मीटर अंतरावर संतृप्त चरबी, ट्रान्स फॅड, अतिरिक्त साखर अथवा सोडियमचे प्रमाण अधिक असलेले अन्नपदार्थांवर प्रतिबंध घातला आहे. तर पानटपऱ्या बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. यासंदर्भात नुकतेच आदेश निर्गमित करण्यात आले होते.

दरम्यान, आदेश प्राप्त झाल्यानंतर अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार अजित कदम यांनी नगर पालिकेला पत्र पाठवून सूचना केल्या होत्या. त्याचप्रमाणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शाळा, महाविद्यालयाच्या शंभर मीटंर अंतरावरील पानटपऱ्या चालकांना बंद करण्याची तंबी देण्यात आली होती. दरम्यान, नगर पालिका आणि पोलिस आता उघडपणे विक्री सुरू मध्यंतरी अन्न व औषध प्रशासनाने खर्रा विक्रेत्यांवर धडक कारवायांचे सत्र सुरू केले होते. या कारवायांच्या भितीमुळे अनेकांनी बरेच दिवस पानठेले पूर्णता बंद ठेवले होते. काहींनी खर्रा, गुटखा विक्रीसुद्धा बंद केली होती. तर काही दिवस लपून-छपून खर्रा, गुटखा विक्री करण्यात आली होती. आता मात्र एफडीएच्या कारवाया पूर्णता थंडावलेल्या आहेत. परिणामी, अनेकांनी खर्रा, गुटखा विक्री पुन्हा सुरू केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

प्रशासनाने संयुक्तरीत्या प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालय परिसर गाठून शंभर मीटर अंतरावरील तब्बल ४० पानटपऱ्या चालकांना नोटीस बजावली असून, तातडीने पानठेले बंद करा, असे फर्मान सोडण्यात आले आहे. तरीसुद्धा पानटपऱ्या सुरू ठेवल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. या प्रकारामुळे पानटपरी चालकांची भंबेरी उडाली आहे. पानटपऱ्या बंद करण्याबाबतचे आदेश प्राप्त झाल्यानंतर नगर पालिकेला पत्र पाठविण्यात आले होते. तद्नंतर संयुक्तरीत्या मोहीम राबवून ठाण्याच्या हद्दीतील ४० हून अधिक पानठेला चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. पानठेले तातडीने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आता पानठेले चालू ठेवल्यास कारवाई केल्या जाईल. असे अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार अजित कदम यांनी सांगितले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande