
नांदेड, 09 ऑगस्ट (हिं.स.)
जागतिक आदिवासी दिनानिमित्त नांदेड येथे आयोजित ‘उत्सव सोहळा २०२६’ कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित राहून आदिवासी समाजाच्या जल, जंगल, जमीन, संस्कृती आणि अस्मितेच्या जतनासाठीच्या योगदानाचा गौरव केला.
आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि हक्कांचे संवर्धन करताना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आदिवासी समाजाच्या सन्मान, अधिकार आणि प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास आमदार भीमरावजी केराम, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार श्रीजया चव्हाण, आ. बालाजी कल्याणकर, माजी आयुक्त आदिवासी विकास संभाजीराव सरकुंडे यांच्यासह आदिवासी समाजातील मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis