लातूरमध्ये युवक काँग्रेसचा ६६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा; पदाधिकाऱ्यांना दिली शपथ
लातूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त लातूर येथील काँग्रेस भवनमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांच्या हस्ते युवक क
युवक काँग्रेस


लातूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त लातूर येथील काँग्रेस भवनमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांच्या हस्ते युवक काँग्रेसच्या ध्वजाचे दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले. या उत्साही वातावरणात उपस्थित सर्व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाशी, समाजाशी आणि देशाशी एकनिष्ठ राहण्याची सामूहिक शपथ देण्यात आली.

याप्रसंगी लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश देशमुख यांनी प्रास्ताविकातून युवक काँग्रेसचा इतिहास आणि तरुणांची समाजातील भूमिका स्पष्ट केली.

प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. दिनेश नवगिरे यांनी संघटनात्मक बांधणी आणि युवकांच्या पक्षकार्यातील योगदानावर सविस्तर भाष्य केले. तर लातूर जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे विचार, ध्येयधोरणे आणि कार्य तळागाळातील लोकांपर्यंत कसे पोहोचवावेत, यावर त्यांनी कार्यकर्त्यांना दिशा दाखवली.

लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करत काँग्रेसच्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेवर ठाम राहून कार्य करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी यांनी आपल्या भाषणातून सर्व युवक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि ऊर्जा निर्माण केली. आगामी काळात समाजातील कुप्रथांविरुद्ध लढण्यासाठी, तसेच काँग्रेसचा विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि जोमाने कामाला लागावे, असा संदेश त्यांनी दिला. हा स्थापना दिवस कार्यक्रम सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरला. यावेळी जिल्ह्यातील विधानसभा अध्यक्ष,तालुका अध्यक्ष,प्रत्येक तालुक्यातून प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande