वेळ पडली तर कोणाचा जीवही घेऊ शकतो - जरांगे
सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. मराठवाड्यात कुणबी समाजाची 4 प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे समोर आल्यानंतर जरांगे पाटील कमालीचे आक्रमक झाले आहेत. माढा येथे आयोजित सभेत बोलताना
अ


सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. मराठवाड्यात कुणबी समाजाची 4 प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे समोर आल्यानंतर जरांगे पाटील कमालीचे आक्रमक झाले आहेत. माढा येथे आयोजित सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत सरकारला थेट इशारा दिला. मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो तशी वेळ पडली तर कोणाचा जीव घेऊही शकतो. मला त्या वाटेवर नेऊ नका, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.

शनिवारी रात्री उशिरा साडेअकरा माढ्यात आगमन होताच समर्थकांनी जेसीबीने फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर झालेल्या सुमारे तासाभराच्या भाषणात जरांगे यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटावर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला.

आता मी कोणाला सोडणार नाही

माढ्यातील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला. जरांगे म्हणाले की, एक वर्षभर मी फडणवीसांना काही बोललो नाही. ज्या बावनकुळेंमुळे ते अडचणीत येतात तर त्यांनी असला कशाला सांभाळायचा? आता मी कोणाला सोडणार नाही. मराठा समाजाच्या अन्नात माती कालवणाऱ्या कोणालाही हा समाज माफ करणार नाही, असे त्यांनी म्हटले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande