
छत्रपती संभाजीनगर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। मराठवाड्याच्या मातीशी असलेले नाते, जनतेच्या प्रश्नांसाठी केलेले कार्य आणि मराठवाड्याच्या विकासासाठी तसेच लोकहितासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने ‘मराठवाडा भूषण’ पुरस्काराने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधा किशन पठाडे यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विभागीय आयुक्त श्री. जी श्रीकांत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पठाडे म्हणाले,
हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि त्याचबरोबर मोठी जबाबदारी देणारा क्षण आहे. जनतेचा विश्वास आणि समाजासाठी काम करण्याची संधी हीच माझी खरी ताकद आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी यापुढेही अधिक जोमाने, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्य करण्याची प्रेरणा या पुरस्कारातून मिळाली आहे.
हा पुरस्कार म्हणजे माझ्या कार्याची केवळ पोचपावती नाही, तर आगामी काळात अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा आणि जबाबदारी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis