पूर्णेत पोलीस ठाण्यासमोर माजी नगराध्यक्षांच्या घरातून सव्वा लाखाची रोकड लंपास
परभणी, 09 ऑगस्ट (हिं.स.)। चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचा प्रकार पूर्णा शहरात समोर आला आहे. ऐन पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरील माजी नगराध्यक्ष सुभाषसिंग ठाकूर यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सव्वा लाखांची रोकड लं
पूर्णेत पोलीस ठाण्यासमोर माजी नगराध्यक्षांच्या घरातून सव्वा लाखाची रोकड लंपास


परभणी, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचा प्रकार पूर्णा शहरात समोर आला आहे. ऐन पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरील माजी नगराध्यक्ष सुभाषसिंग ठाकूर यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सव्वा लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्याच्या गेटसमोरच घरफोडी झाल्याने “पोलीस ठाण्याच्या दारातही घर सुरक्षित नसेल तर शहरातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय?” असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पूर्णा पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर ठाकूर कुटुंबीयांचे घर आहे. कुटुंबीय बाहेरगावी असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन खोल्यातील चार कपाटाचे कुलूप तोडून अंदाजे १ लाख २८ हजार रुपये रोख चोरुन नेले आहेत. घटनेची माहिती शनिवारी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पुर्णा पोलीस ठाण्यात पुजा सुभाषसिंग ठाकूर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande