श्रीलंका कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात बदल, साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानची निवड
नवी दिल्ली, 09 ऑगस्ट (हिं.स.)श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. डावखुरा फलंदाज साई सुदर्शन दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. निवड समितीने त्याच्या जागी सरफराज खानचा भारतीय कसोटी सं
सरफराज खान


नवी दिल्ली, 09 ऑगस्ट (हिं.स.)श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. डावखुरा फलंदाज साई सुदर्शन दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. निवड समितीने त्याच्या जागी सरफराज खानचा भारतीय कसोटी संघात समावेश केला आहे.

साई सुदर्शन सध्या बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) मध्ये त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला झालेल्या स्ट्रेस रिॲक्शन दुखापतीतून सावरत आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून त्याने तंदुरुस्ती मिळवण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे. पण, वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.

साई सुदर्शनच्या जागी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात सरफराज खानचा समावेश करण्यात आला आहे. सरफराज लवकरच कोलंबो येथे भारतीय संघात सामील होईल. त्यानंतर संघ पहिल्या कसोटीसाठी गॉलकडे रवाना होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना १५ ऑगस्ट २०२६ पासून गॉल येथे खेळला जाईल. सरफराजसाठी संघात परतण्याची ही एक महत्त्वाची संधी आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि तो यापूर्वी कसोटी संघातही होता.

सरफराज खानने फेब्रुवारी २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत सहा कसोटी सामने खेळले आहेत. सरफराजने ११ डावांमध्ये ३७.१० च्या सरासरीने आणि ७४.९४ च्या स्ट्राइक रेटने ३७१ धावा केल्या आहेत. कसोटी सामन्यांमध्ये तीन अर्धशतके आणि एक शतकही त्याने झळकावले आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या १५० धावा आहे. सरफराजने आपली शेवटची कसोटी नोव्हेंबर २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळली होती.

भारताचा अद्ययावत कसोटी संघ

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी आणि सरफराज खान.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande