‘हे पालकमंत्री नव्हे, बालकमंत्री’; सुषमा अंधारेंची जोरदार टीका
सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर १९ हून अधिक गुन्हे दाखल असल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गोरे यांच्यासह भाजपव
Jsjs


सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर १९ हून अधिक गुन्हे दाखल असल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गोरे यांच्यासह भाजपवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. गोरे यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

“काय कीर्ती राव, मिस्टर गोरे?” असा सवाल करत अंधारे यांनी गोरे यांच्यावर फसवणुकीसह महिलांशी संबंधित कथित प्रकरणांचा उल्लेख केला. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये नावे आलेल्या व्यक्तींना भाजपमध्ये स्थान दिले जात असल्याचा, तर पक्षासाठी काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गोरे यांच्यावर टीका करताना “हे पालकमंत्री नव्हे, बालकमंत्री आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

कोरोना महामारीच्या काळात मयत रुग्णांना जिवंत दाखवून कथित बोगस बिले तयार करून पैसे लाटल्याचा गंभीर आरोप अंधारे यांनी केला. या काळात २०० हून अधिक बोगस बिले तयार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. खोटा मेडिकल ऑफिसर दाखवून त्याच्या स्वाक्षरीने हजारो बिले मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.

राज्यातील सत्तासमीकरणांवर भाष्य करताना अंधारे यांनी महायुतीतील कथित अंतर्गत मतभेदांवरही टीका केली. खातेवाटपावरून सत्ताधारी पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यावरूनही मतभेद असल्याचे सांगत काही नेते आगामी राजकीय घडामोडींसाठी ‘बाशिंग बांधून तयार’ असल्याचा टोला त्यांनी लगावला. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत जयकुमार गोरे आणि भाजपविरोधात केलेले आरोप राजकीय स्वरूपाचे असून, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी या वृत्तात झालेली नाही. त्यामुळे संबंधित आरोपांवर जयकुमार गोरे आणि भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande