
बंगळूरू, 09 ऑगस्ट (हिं.स.)भारतीय क्रिकेटमधील वाढत्या दुखापतींच्या पार्श्वभूमीवर, बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सवर (सीओई) प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. क्रिकेटपटूंच्या पुनर्वसन प्रक्रियेवर, फिटनेस मूल्यांकनावर आणि क्रीडा विज्ञान पथक व राष्ट्रीय निवड समिती यांच्यातील समन्वयावर होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, सीओईचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी या संस्थेचा बचाव केला आहे. त्यांनी सांगितले की, सीओईची भूमिका केवळ जखमी क्रिकेटपटूंच्या पुनर्वसनापुरती मर्यादित नाही, तर क्रिकेटपटूंना सुधारणा करण्यास आणि उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करणे हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे.
लक्ष्मण यांनी स्पष्ट केले की, संघ व्यवस्थापन आता भारतीय क्रिकेटपटूंच्या फिटनेसवर सतत लक्ष ठेवण्यावर भर देत आहे. त्यांनी सांगितले की, मालिकेदरम्यान पारंपरिक यो-यो चाचणी घेणे शक्य नाही. त्यामुळे, फिटनेसवर लक्ष ठेवण्यासाठी ब्रॉन्को चाचणीचा वापर केला जात आहे. लक्ष्मण यांनी स्पष्ट केले की, ब्रॉन्को चाचणीमुळे मालिकेदरम्यानही क्रिकेटपटूंच्या फिटनेसवर सतत लक्ष ठेवता येते. ही चाचणी एड्रियन यांनी विकसित केली आहे. लक्ष्मण म्हणाले, जेव्हा एखादा क्रिकेटपटू मालिकेत सहभागी असतो, तेव्हा यो-यो चाचणी घेतली जाऊ शकत नाही. त्यामुळे, फिटनेसवर सतत लक्ष ठेवण्यासाठी आम्ही एड्रियन यांनी विकसित केलेली ब्रॉन्को चाचणी सुरू केली आहे. या प्रणालीचा उद्देश खेळाडूंवर अतिरिक्त दबाव न टाकता त्यांच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवणे हा आहे. यामुळे संघ व्यवस्थापनाला सामन्यासाठी खेळाडूंची तयारी कोणत्या स्तरावर आहे हे समजण्यास मदत होते.
लक्ष्मण यांनी असेही सांगितले की, सेंटर ऑफ एक्सलन्स आणि भारतीय संघ व्यवस्थापन यांच्यात सतत संवाद असतो. क्रिकेपटूंचा फिटनेस आणि त्यांच्या पुनरागमनाबाबत दोन्ही पक्ष संपर्कात राहतात. ही प्रणाली दुखापतीतून परतणाऱ्या क्रिकेटरटूंचे टप्प्याटप्प्याने मूल्यांकन करण्यास मदत करते. कोणताही क्रिकेटपटू पूर्ण तंदुरुस्तीशिवाय मैदानात उतरणार नाही, हे सुनिश्चित करणे हा याचा उद्देश आहे.
बंगळूरू येथे एका पत्रकार परिषदेत लक्ष्मण यांनी सांगितले की, सेंटर ऑफ एक्सलन्सकडे केवळ दुखापतग्रस्त क्रिकेटपटूंच्या उपचार आणि बरे होण्याचे केंद्र म्हणून पाहू नये. लक्ष्मण म्हणाले, सीओई हे केवळ एक पुनर्वसन केंद्र नाही. क्रिकेटपटूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करण्यात त्याची खूप मोठी भूमिका आहे. ते म्हणाले की, ही संस्था क्रिकेटपटूंची तंदुरुस्ती आणि कामगिरीशी संबंधित विविध पैलूंवर काम करते.
भारतीय क्रिकेटपटूंना होणाऱ्या दुखापतींच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर, लक्ष्मण यांनी कोणत्याही व्यक्तीला किंवा विभागाला दोष देण्यास नकार दिला. ते म्हणाले की, दुखापती या व्यावसायिक क्रिकेटपटूच्या कारकिर्दीचा एक भाग आहेत आणि क्रिकेटपटूंवर सतत लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरते. ते म्हणाले, दुखापती या कोणत्याही क्रिकेटपटूच्या कारकिर्दीचा भाग असतात. त्यामुळे, देखरेख प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे. आणि आम्ही 'दोषारोप' हा शब्द वापरत नाही, कारण तसे करणे म्हणजे कोणालातरी बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न करण्यासारखे होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे