भारताच्या बसंत आणि शहनवाझने जागतिक ऍथलेटिक्स U-20 चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास
वॉशिंग्टन, 09 ऑगस्ट (हिं.स.)भारतीय खेळाडू बसंत कुमार आणि शहनवाझ यांनी अमेरिकेतील युजीन येथे सुरू असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स U-20 चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला. बसंत कुमारने U-20 चॅम्पियनशिपमध्ये उंच उडीत भारतासाठी पहिले रौप्य पदक जिंकले, तर शहनवाझ खा
शहनवाज खान


वॉशिंग्टन, 09 ऑगस्ट (हिं.स.)भारतीय खेळाडू बसंत कुमार आणि शहनवाझ यांनी अमेरिकेतील युजीन येथे सुरू असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स U-20 चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला. बसंत कुमारने U-20 चॅम्पियनशिपमध्ये उंच उडीत भारतासाठी पहिले रौप्य पदक जिंकले, तर शहनवाझ खानने लांब उडीत भारतासाठी पहिले कांस्य पदक पटकावले. बसंत आणि शहनवाझ हे दोन्ही पदके जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले आहेत.

राजस्थानच्या गंगानगर येथील बसंत कुमारने जागतिक ऍथलेटिक्स U-20 चॅम्पियनशिपमधील उंच उडीच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. बसंतने २.२१ मीटरची उडी मारली, तर अल्जेरियाच्या युनेस अयाचीने तेवढ्याच उंच उडीसह सुवर्णपदक जिंकले. बसंतनेही २.२१ मीटरची उंच उडी मारली असली तरी, त्याने ही उंची दुसऱ्या प्रयत्नात पार केली. त्यामुळे, काउंटबॅक नियमानुसार त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ग्रेट ब्रिटनच्या ओटिस पूलने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात २.२१ मीटरची उडी यशस्वी केली असली तरी, त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा बसंत, जागतिक २० वर्षांखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला.

उंच उडी व्यतिरिक्त, भारताच्या शहनवाझने लांब उडीतही उत्कृष्ट कामगिरी केली. शहनवाझने २०२६ च्या जागतिक २० वर्षांखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ७.८४ मीटरची उडी मारून सर्वांना आश्चर्यचकित केले. यासह त्याने कांस्य पदक जिंकले आणि भारतासाठी असे करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. शहनवाझच्या नावावर २० वर्षांखालील राष्ट्रीय विक्रमही आहे. त्याने जून २०२६ मध्ये ८.३० मीटरची उडी मारून इतिहास रचला. उत्तर प्रदेशातील प्रतापगडचा रहिवासी असलेल्या या खेळाडूने आशियाई २० वर्षांखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकही जिंकले आहे. शहनवाजच्या स्पर्धेत, इटलीच्या डॅनिएल लिओनार्डोने ७.९७ मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले, तर मेसन मॅकग्रोडरने ७.९६ मीटर उडी मारून रौप्यपदक पटकावले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande