यवतमाळ : मोटरच्या तांत्रिक बिघाडामुळे नेर शहरामध्ये तीव्र पाणीटंचाई
यवतमाळ, 01 सप्टेंबर (हिं.स.)। शहराला मागील तीन दिवसापासून पाणीटंचाईच्या झळा भर पावसाळ्यात सोसाव्या लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटरच्या लाईनवर तांत्रिक बिघाड आल्यामुळे पाणीपुरवठा बंद असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामु
यवतमाळ : मोटरच्या तांत्रिक बिघाडामुळे नेर शहरामध्ये तीव्र पाणीटंचाई


यवतमाळ, 01 सप्टेंबर (हिं.स.)। शहराला मागील तीन दिवसापासून पाणीटंचाईच्या झळा भर पावसाळ्यात सोसाव्या लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटरच्या लाईनवर तांत्रिक बिघाड आल्यामुळे पाणीपुरवठा बंद असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे शहरातील चार हजार नळ तोट्या बंद पडल्या असून नागरिकांना हातपंप किंवा विहिरीवर धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे.

पाथ्रड गोळे येथील धरणावरून शहराला पाणीपुरवठा होतो. धरणाच्या कडेला पाणीपुरवठा विभागाचे पंप हाऊस व वीजपुरवठा केंद्र उभारण्यात आले आहे. याच ठिकाणाहून शहराला पाणीपुरवठा केला जातो. येथून येणारे पाणी शहरातील माणिकवाडा रोड लगतच्या फिल्टर प्लांटला पुरवल्या जाते. या ठिकाणी फिल्टर व स्वच्छ झालेले पाणी शहराची तहान भागवण्याच काम करते. परंतु, मागील तीन दिवसांपूर्वी या पंप हाऊसला होणाऱ्या वीज पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड आल्याने मोटरी बंद पडल्या. स्वतंत्रपणे एक्सप्रेस फिडर घेऊन २४ तास वीजपुरवठा या ठिकाणी केला जातो. मात्र मागील तीन दिवसांपासून अनामिक कारणाने मोटरी बंद आहेत. चौकशी केली असता फॉल्ट शोधण्याचे काम सुरू आहे, असे सांगण्यात आले. एक्सप्रेस फिडरचा किंवा ट्रांसफार्मरचा फॉल्ट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रांसफार्मरचा फॉल्ट असल्यास मोटरी सुरू होण्यास आणखी दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande