
नवी दिल्ली, 01 सप्टेंबर (हिं.स.)। सार्वजनिक क्षेत्रातील ऑईल अँड गॅस मार्केटिंग कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याच्या अनुषंगाने विमान इंधन म्हणजेच एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ)च्या किमतीत ५.४६ टक्क्यांनी वाढ केली आहे. नवीन दर मंगळवारपासून लागू झाले आहेत.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी)नुसार, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ)च्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता देशांतर्गत एअरलाईन्ससाठी विमान इंधनाचा दर ६,२८० रुपयांनी वाढून १,२१,२८० रुपये प्रति किलोलीटर झाला आहे, जो यापूर्वी १,१५,००० रुपये प्रति किलोलीटर होता. एटीएफच्या किमतीत ही वाढ १ ऑगस्ट रोजी ५ रुपये प्रति किलोलीटरच्या वाढीनंतर पुन्हा करण्यात आली आहे. या दोन वाढींमुळे एअरलाईन्सवरील आर्थिक भार वाढणार आहे, ज्यांच्यासाठी एटीएफ हा ऑपरेटिंग कॉस्टच्या ४० टक्क्यांपर्यंतचा भाग असतो.
एव्हिएशन सेक्टरमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एटीएफमध्ये सलग दोन वेळा झालेल्या वाढीमुळे विमान कंपन्यांवरील आर्थिक भार वाढेल. विमान इंधनाच्या किमतीत दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल केला जातो. हा बदल आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या रेफरन्स किमती आणि फॉरेन करन्सी रेट्सच्या आधारे केला जातो. स्थानिक कर, जसे की व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (व्हॅट), यामुळे त्याच्या किमती प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या असतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule